आजचा प्रश्न

प्रश्न- सध्या कोरोना थैमान घालत आहे आणि कंडोम्सचा तुटवडा आहे अशी बातमी आहे, पण करोना पसरत असताना सेक्स केला तर चालतो का?

उत्तर- दोन निरोगी व्यक्तींमध्ये होणारा सेक्स हा निर्धोक असतो. नीट वाचा... दोन निरोगी व्यक्तींमधला सेक्स. फक्त कोरोना असणे-नसणे याचा संबंध नाही. कोणताही आजार ज्यात संसर्ग शक्य आहे, त्यात सेक्सपासून लांब राहणे उत्तम. बाधित व्यक्तीच्या थुंकी, खोकला, शिंक यातून पडणारे थेंब दुसऱ्या जवळच्या माणसात पसरतात. अर्थातच अनोळखी व्यक्तीशी किसींग करणे धोक्याचे ठरेल. तसेच नेहमीच्या पार्टनर बरोबर सेक्स करणे निर्धोक, पण तो निरोगी असेल तरच. तो qurantine असेल तर social distancing पाळावेच लागणार. इथे सेक्सचा संबंध नाही, सेक्स टाळावं हे योग्य. कोरोना बाधित व्यक्तीत आजाराने जर इच्छाच नसेल तर सेक्सचा प्रश्नच येत नाही. पण ज्याची इच्छा असेल त्याने यामध्ये पॉर्न पाहून हस्तमैथुन करणे, सेक्स चॅटिंग, फँटसी हे पर्याय वापरावे.
   कंडोमचा खप वाढला, कारण सर्वांना social distancing मुळे घरीच थांबणे भाग आहे. सेक्स ही नैसर्गिक भूक आहे. प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून आणि सेक्स भरपूर एन्जॉय करता यावे म्हणून कंडोम खप वाढले. यात गैर काहीच नाही. नोकरी, व्यवसाय करणारे बरेच जोडपे ७ दिवसात फक्त १-२ दिवस सेक्स करतात. त्यांना आता जास्त वेळ मिळाला. त्याचा वापर ते सेक्सची आवड आहे म्हणून त्यांच्या लैंगिक भुकेनुसार आस्वाद घेणार एवढेच. अशा वेळी ते कंडोम वापरतात हे बरेच. नाहीतर ९ महिन्यानंतर लोकसंख्या वाढणार. त्यामुळे कंडोम वापरणे हा योग्य निर्णय नाही का?


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)