आजचा प्रश्न

प्रश्न- स्त्रियांच्या लैंगिक समस्या आता आता पाहायला मिळतात की पूर्वीही होत्या ? 
उत्तर- पुरूषांना लैंगिक समस्या असतात. पण स्त्रियांना देखील समस्या असतात, हे काही पुरुषांना पटत नाही किंवा माहीत नसते. वासना कमी-अधिक असणे, कामपूर्ती न मिळणे, वेदनायुक्त संभोग, सेक्स नकोसा वाटणे, लैंगिक आकर्षण कमी किंवा अजिबातच नसणे या समस्या आहेत. त्यामागील कारणे शोधून उपचार करावा लागतो. या समस्या पहिल्यापासून आहेत. हल्ली हल्लीच या पाहायला मिळतात, हा गैरसमज आहे. पूर्वीच्या लोकांना सेक्सविषयक माहिती नव्हती. त्यामुळे सेक्स असा-तसाच चालायचा. स्त्री स्वतःच्या लैंगिक भुकेबद्दल जागृत नव्हती किंवा इच्छा दाबून ठेवायची. आता उघडपणे बोलू लागली एवढेच.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)