आजचा प्रश्न
प्रश्न- अपंगांना सर्व कामआसने करता येत नसतात. त्यांच्या कामजीवनात आनंद असतो का ?
उत्तर- इतरांसारखा पूर्ण आनंद मिळत नसला तरी शरीराचा कोणता अवयव, कोणता भाग सदोष आहे त्याप्रमाणे सल्ल्यानुसार त्यांना आवडेल त्या आसनात कामसुख घेऊ शकतात. स्त्री/पुरुष कोणीही अपंग असेल तर स्त्रीला कामपूर्ती मिळविण्यासाठी व्हायब्रेटर, मुखमैथुन याचा वापर १००% फायदेशीर ठरतोच. एखादे आसन इतरांसारखे करता आले नाही म्हणून वाईट वाटण्याचे कारण नाही. कुढत न बसता जे शरीर आहे त्याचा संभोगासाठी कसा वापर करता येईल याचा विचार करावा. तज्ञांकडून विविध कामआसनांचा अपंगांसाठी कसा वापर करता येईल हे शिक्षण घ्यावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)