आजचा प्रश्न
प्रश्न- माझ्या पत्नीबरोबर नीट सेक्स होतो पण मैत्रिणी बरोबर सेक्स करताना ताठरता येत नाही. असे का होते ?
उत्तर- सर्व लैंगिक क्रियेत कधीच ताठरता येत नसेल तर ती नपुंसकता गंभीर म्हणता येईल. पण एका व्यक्तीबरोबर येते आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर येत नसेल तर ती तात्पुरती नपुंसकता असते. विवाहबाह्य सेक्स करताना घाईघाईने सेक्स करावा लागतो, खाजगीपणाचा अभाव, जमेल की नाही याची भीती, वेळेचा अभाव, मनापासून करत नसाल तर जे आपण करतोय त्याबद्दल अपराधी भावना, मैत्रिणीची तुमच्याकडून अति अपेक्षा असणे या कारणांनी ताठरता येत नाही. यातून मार्ग काढता येतो. काही वेळा गोळी घेऊन ही समस्या सुटते, वर उल्लेख केलेले अडथळे दूर केले की ही समस्या उद्भवत नाही. डॉक्टरी सल्ल्याने गोळी घ्यावी.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)