आजचा प्रश्न
प्रश्न- खात्रीशीर गर्भधारणा होण्यासाठी मासिक पाळीच्या ९ व्या दिवसापासून ते २२ व्या दिवसापर्यंतच्या १४ दिवसांतच सेक्स का करायचा असतो ? 
उत्तर- स्त्रियांना साधारणपणे २८ दिवसानंतर पाळी येते आणि काहींमध्ये ३० दिवसानंतर. यामध्ये सरासरी मधला दिवस म्हणजे २८ दिवसांनी पाळी येत असेल तर १४ वा दिवस आणि ३० दिवसांनी येत असेल तर १५ वा दिवस येतो. या दिवशी आणि याच्या आधी तीन दिवस आणि पुढील तीन दिवस असे ७ दिवस स्त्री बीजांड फुटून जिवंत असण्याचे प्रमाण जास्त असते. या दरम्यान सेक्स केला तर शुक्राणू आणि स्त्री बीजांड यांचा संयोग होतो आणि गर्भधारणा होते. परंतु हा नियम फक्त आणि फक्त ज्यांना नियमित पाळी येत असेल त्यांनाच लागू होतो.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)