आजचा प्रश्न

प्रश्न- नवविवाहित जोडप्यांनी कंडोमऐवजी गर्भनिरोधक गोळ्या घेणे कितपत योग्य आहे?
उत्तर- गर्भनिरोधक गोळ्या विश्वासार्ह आहेत. पण स्वतः घेण्यापेक्षा स्त्री रोग तज्ञ डॉक्टरचा सल्लानुसार ते घ्याव्यात. नवविवाहित स्त्रीने गर्भ राहू नये, म्हणून पाळीच्या ५ व्या दिवसापासून रोज रात्री एक अशी गोळी घ्यावी. सलग ४-६ महिने घेतले तर डॉक्टरकडून स्तन, गर्भाशय याची तपासणी करुन घ्यावी. अर्धवट स्वतःहून डोस घेत राहणे हे धोकादायक असते. कॅन्सर, स्तनमधे गाठ असणे, लिव्हरचे आजार, कावीळ, रक्त गोठणे यामधे काही तक्रार असेल तर अशावेळी गोळी घेणे चुकीचे असते. काहीमधे गोळीने स्तन दुखणे, वजन वाढणे, पित्त, डोकेदुखी अशा तक्रारी येतात. त्यामुळे स्वतः परस्पर उपचार सुरू करु नये.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)