आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक समस्यांवर मल्टिविटामीनच्या गोळ्या दिल्या जातात हे किती योग्य आहे ?
उत्तर- पूर्वी कोणत्याही लैंगिक समस्यांवर विटामिनच्या गोळ्यांचा वापर केला जायचा. त्यामागे सर्व मानसिक कारणच आहे असे समजायचे. पण जसे जसे कामविज्ञान प्रगती करत गेले तसे चांगली औषधे उपलब्ध झाली. त्यामुळे विटामीनच्या गोळ्या देण्यात फारसा अर्थ राहिला नाही. पूर्वी लोकांना काही तरी गोळ्या खातोय यातून मानसिक समाधान मिळायचे. आता योग्य औषध खाल्ले की लगेच गुण येतो. विटामीन सी, बी, झिंक यांची गरज असते पण प्रत्येकात हे कमी असते असे नाही. त्यामुळे कारण शोधूनच कोणत्या गोळ्या द्यायचे हे तज्ञ ठरवतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)