आजचा प्रश्न
प्रश्न- माझे लग्न होऊन एक महिना झाला आहे. माझ्या पतीच्या लिंगाला कोड आहे. त्याने हा आजार मला होईल का ?
उत्तर- कोड हा त्वचेमधील एका घटकाच्या कमतरतेमुळे होतो. तसंच त्यामागे मानसिक त्रास हे देखील कारण आहे. हा संसर्गजन्य आजार नाही. समाजात एखाद्याच्या अंगावर वेगळा डाग असेल तर त्याला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. खरे तर हे चुकीचे आहे. कोड असल्याने त्या व्यक्तीमध्ये कोणतीही लैंगिक समस्या असते असे नाही किंवा तो पालक बनू शकत नाही असेही नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)