आजचा प्रश्न


प्रश्न- मी १८ वर्षीचा तरुण आहे. माझ्या वृषणग्रंथी (टेस्टीस) खाली सरकलेल्या अवस्थेत आहेत. कातडी चरबटलेली आहे. मी काय करू?
उत्तर- वृषणग्रंथी दोन असतात व त्या वृषणकोषात असतात. वातावरणातील तापमानामुळे त्यांची वरखाली हालचाल होत असते. वृषणकोषांची कातडी ही शरीरावरील इतर त्वचेपेक्षा वेगळी असते.
थंडीमध्ये दोन्ही वृषणग्रंथी वर जातात. त्वचा जाड व खडबडीत दिसते. उष्णता वाढली की वृषणग्रंथी खाली लटकतात. त्यावेळी ही त्वचा म्हातारपणीच्या त्वचेसारखी दिसते. हे अत्यंत नैसर्गिक आहे. घाबरण्याचे काही कारण नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)