आजचा प्रश्न

प्रश्न- लैंगिक रोगावर सर्वोत्तम औषध कोणते? 

उत्तर- लैंगिक रोग म्हणजे गुप्तरोग असा अर्थ काढला तर विविध गुप्तरोगांवर वेगवेगळी औषधी आहेत. त्याचा उपचार त्वचारोगतज्ञ डॉक्टर करतात. आणि लैंगिक समस्या म्हटले तर स्त्री पुरुषाला आलेल्या लैंगिक समस्येवर allopathy औषधी सर्वोत्तम असतात. त्याआधी लैंगिक शिक्षण देऊन गैरसमज दूर कराववे लागतात. सगळ्याच समस्या गोळ्या खावूनच बऱ्या होतात हा भ्रम आहे. यावरच लोकांना लुटले जाते. आणि सत्य काय आहे हे सांगितले जात नाही. म्हणून पेशंट इकडून तिकडे नुसता फिरत राहतो. पेशंटने तज्ञ डॉक्टरला सल्ला देण्यापेक्षा त्यांचे ऐकले तर फायद्याचे ठरते.





डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)