आजचा प्रश्न
प्रश्न- नपुंसकत्वाचे काही प्रकार असतात का ? 

उत्तर- नपुंसकता म्हणजे पुरुष लिंगाला पुरेशी ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता वीर्यपतन होईपर्यंत न टिकणे. यालाच इरेक्टाइल डिसफकशन/इम्पोटंस असे म्हणतात. मानसिक आणि शारीरिक असे दोन कारणे आहेत. vit D3, testosterone, रक्त, zinc याच्या कमतरतेमुळे आणि prolactin संप्रेरक, cholesterol,  creatinine, रक्तातील साखर यांची लेवल वाढल्याने नपुंसकता येते. कारण कोणतेही असले तरी सगळ्या केस मध्ये पहिले औषध sildenafil/ tadalafil हे वापरले जाते, काही गंभीर केसेस मध्ये लिंगात इंजेक्शन घेणे गरजेचे असते. तसेच venous likage या समस्येवर शस्त्रक्रिया हा पर्याय आहे. 


मानसिक कारणांमुळे आलेल्या समस्येवर आधी sex educate करावे लागते. त्यात तो क्लिअर झाला तर एकाही गोळी ची गरज नसते किंवा काही दिवस गोळी घ्यावी लागते. व्हाट्सप/गूगल विद्यापीठामधून शिकून स्वतः औषधे घेणे टाळा. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपचार अपेक्षित. पेपरमधील जाहिराती, मलम तेल, काही पावडर यावर विश्वास ठेवू नका, लिंगाला तेल लावून make up करत बसू नये.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)