आजचा प्रश्न
प्रश्न- यूट्युबवरील विविध चॅनेल्सच्या माध्यमातून लैंगिक समस्यांवरील उपचार सांगितले जातात. त्यात किती तथ्य ? 
उत्तर- एकच उपचार हा सर्वांना कधीही लागू होत नाही. खरं तर अशा प्रकारच्या चॅनेल्सला स्पॅममध्ये टाकावे. लोकांच्या अपेक्षा असतात की, शॉर्टकटने घरात बसून उपचार व्हावा. पण तसे होईल का? हे चॅनेल्स अशा लोकांना फसवण्याचे, दिशाभूल करण्याचे, अशास्त्रीय माहिती देऊन अपेक्षा वाढवण्याचे काम करत असतात. उदा. लिंग वाढवतो, स्तन वाढवतो, स्टॅमिना वाढवतो, घरातच सेक्स समस्येवर उपचार करा, अशी आकर्षक शीर्षके ठेऊन त्यांची दिशाभूल करतात. तरुणांच्या अविवेकी विचाराला हे अजून खतपाणी घालतात. अशाच एका चॅनेलवर आम्ही कारवाई केली आहे. योग्य माहिती घ्या. अशा चॅनेल्सपासून सावध राहा. त्यांना विरोध केला पाहिजे. यूट्यूबवर काय माहिती द्यावी, याला फार बंधन नाही. त्यामुळे हे सगळे फोफावत आहे. गरज आहे तरुणांनी स्वतःचा विवेक जागृत ठेवण्याची.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)