आजचा प्रश्न
प्रश्न- निव्वळ लैंगिक समस्या आहे म्हणून एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते का ?
उत्तर- मनाने हळवी व्यक्ती लैंगिक समस्या आहे म्हणून हे करू शकते. पुरुषांमध्ये ताठरता न येणे, शीघ्रवीर्यपतन, लिंग लहान आहे असे वाटणे आणि ते फार मनावर घेणे, स्त्री पार्टनरला सुख देऊ शकणार नाही असा समज करून घेणे, हस्तमैथुन जास्त झाले म्हणून स्टॅमिना संपला आहे आणि मी अपयशीच होणार अशा विचाराने दबावाखाली लग्न करतात किंवा नंतर यापैकी काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या, की आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. खरे तर यात गैरसमज अधिक असतात आणि समस्या फारशी गंभीर नसते असे दिसून येते. स्त्रियांच्या बाबतीत, सेक्समध्ये बिलकूल आवड नसणे, दबावाखाली लग्न करणे, पतीबरोबर सेक्स करताना 'सेक्स' या कृतीबद्दल मनात पाप करतोय अशी भावना असेल, तर ती आत्महत्या करू शकते. हे काही करण्याची गरज नसते.
थोडक्यात योग्य उपचार, लैंगिक जीवनाविषयी माहिती करून घेतली की सर्व व्यवस्थित होते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)