आजचा प्रश्न

प्रश्न- मी २४ वर्षीय विवाहिता आहे. पती रोज संबंध ठेवतात, अगदी मासिक पाळीच्या काळातही. नकार दिल्यास भांडण करतात. विवाहाला चार वर्षे झाली आहेत. केवळ सेक्सबाबतच त्यांचा अतिरेक कळत नाही. मला जाणून घ्यायचे आहे की, माझ्या पतीला सेक्सचे व्यसन तर लागले नाही ना? 

उत्तर- काही मानसिक आजारात, पॉर्नचे व्यसन (नुसते पॉर्न बघणे आणि पॉर्नचे व्यसन वेगळे) यामध्ये सेक्सची भूक वाढते. इच्छेविरुद्ध सेक्स ही अडचण आहेच. मासिक पाळीच्या दिवसात सेक्स करायला प्रत्येक स्त्रीला आवडतोच असे काही नाही. परहस्तमैथुन हा एक पर्याय आहे पण हा उपचार समजू नये. दोघांनी तज्ञ डॉक्टरचा सल्ला, भेट घेतली पाहिजे. यात अवघड असते ते म्हणजे पुरुष स्वतःला सेक्स प्रॉब्लेम आहे हे मान्यच करत नाही. त्यामुळे तो उपचारासाठी तयार होत नाही. परस्पर उपचार घेणे टाळा.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)