आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स लाइफ रिचार्ज कशी करायची ?
उत्तर- रिचार्ज करावे लागते म्हणजे डेटा कमी झाला. काही आजारात सेक्स कमी येतो. वयानुसार कमी येतो पण संपत नाही. फक्त योनीमार्गात शिश्नप्रवेश म्हणजेच सेक्स असे नाही. त्याच्या आधीच्या इतरही क्रिया ह्या सेक्समधे येतात. रिचार्ज करण्यासाठी दोघांना सेक्सची जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती अपरिहार्य आहे. सेक्समधील सुख हे प्रत्येक वेळी १००% मिळतेच असे नाही. १००%च्या मागे धावलात तर जेवढे सुख मिळते तेही गमवावे लागेल. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. पुरुषांची व्यसनाधिनता, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव हे सेक्स डेटा लवकर कमी होण्यासाठी कारणीभूत असतात. बऱ्याचदा पुरुष नुकसान होईपर्यंत हे मान्य करत नाहीत. वेगळ्या सेक्स पोझिशन्स वापरण्याचे फायदे, कामुक चित्रपट पाहण्याचे फायदे, नग्नतेला न लाजणे याचे महत्व समजून घ्या. त्यासाठी तज्ञ डॉक्टरचा सल्ला हवाच. ज्या ज्या वयात नैसर्गिक बदल झालेत त्या त्या वयात सेक्स जसे जमेल तसे स्वीकारा. ताठरता, शीघ्रपतन यावर allopathy औषधे आहेत. त्याचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करता येतो. ऑनलाइन औषध, क्रीम या मायाजालात स्वतःकडे पैसे जास्त असतील तर वाया घालवा. सत्य माहिती हवी असेल तर अभ्यास करा आणि जेवढे शक्य तेवढा अवलंब करा. अजून फायदा होऊ शकतो पण त्याची सुरुवात वयाच्या २०-२५ वर्षापासून करता येईल.
निरर्थक कर्मकांड करण्यापेक्षा लैंगिक सुख घेणे १००० पटीने कधीही चांगले !
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)