आजचा प्रश्न
प्रश्न- विवाहबाह्य संबंधांचे कारण लैंगिक अतृप्तता तर नाही ना ?
उत्तर- प्रत्येक वेळा हे कारण नाही. दोघांमधील मत भिन्नता, वाद विकोपाला गेले असतील तरी बाह्य संबंध जाणीवपूर्वक केले जाऊ शकतात. साथीदाराची एखादी लैंगिक समस्या, लैंगिक भुकेमध्ये मोठी तफावत, पुढील व्यक्ती समलिंगी असणे, व्यक्ती आवडला नसताना, इच्छा नसताना लग्न करावे लागले असेल तरी असा प्रकार घडतो. सेक्समधील वेगळेपणा म्हणून करून पाहण्यासाठी, नोकरी, व्यवसाय निमित्त जास्त काळ वेगळे असल्याने वाढलेले सेक्सचे शमन करण्यासाठी, नोकरीच्या ठिकाणी एकत्र काम करताना एकमेकांना लैंगिक आकर्षण वाढू शकते. भावनिक नाते विवाहबाह्य देखील जमू शकते. व्यवसाय, नोकरीमध्ये विधवा/घटस्फोटित स्त्री ही काही पुरुषांचे लैंगिक सुखासाठी easy target असू शकते. अशा विविध कारणे आणि परिस्थितीत विवाहबाह्य सेक्स स्त्री-पुरुष दोघांकडूनही घडते. असे प्रकार उघडकीला आले की मानसिक धक्का, वैवाहिक आयुष्य धोक्यात येणे काहीही घडू शकते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)