आजचा प्रश्न

प्रश्न- मी २१ वर्षांची तरुणी आहे. १ वर्षापासून माझ्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही नेहमी सेक्स करतो. पण मी कधीच डिस्चार्ज होत नाही. मला काही आजार आहे का ? जर असेल तर त्यावर काय उपाय आहे ? भविष्यात मी आई होऊ शकते ना ? 
उत्तर- स्त्रीला कामपूर्ती मिळण्यासाठी साथीदार आणि स्वतःला माहीत असावे लागते, की शरीरातील कोणत्या भागाला उद्दीपित करून कामपूर्ती मिळणार आहे. प्रत्येक निरोगी स्त्रीला कामपूर्ती मिळू शकते, ती सेक्स करतानाच मिळाली पाहिजे, प्रत्येक वेळी मिळालीच पाहिजे, स्त्री-पुरुष दोघांना एकदमच मिळायला पाहिजे असे काही नसते. कामुक झाल्यावर स्त्री योनीमार्गात ओलावा निर्माण होतो तो ओलावा म्हणजे डिस्चार्ज असे म्हणत असाल तर तो न येण्यामागची मानसिक शारीरिक कारणे शोधून त्यावर उपचार करावा लागतो. ऑनलाइन उपचार हा सगळा भंपकपणा आहे. विश्वास ठेऊ नका. आई होण्यासाठी सेक्स ठरावीक दिवशी होऊन शुक्राणू आणि स्त्री बीजांड याचा संयोग होणे आवश्यक असते. डिस्चार्ज नव्हे. शिवाय लग्न दुसऱ्या पुरुषाबरोबर झाले तर त्याच्या सेक्समधील आवडीनिवडी, स्किल्स यावर वेगळा अनुभव येणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)