आजचा प्रश्न

प्रश्न- हायमेन सर्जरीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का ? 
उत्तर- हायमेन म्हणजे योनीद्वारपटल म्हणजेच योनीमार्गातील पातळ पडदा. संभोग किंवा काही वस्तू प्रवेशित केल्याने, हस्तमैथुन केल्याने हा विदीर्ण होतो. Virginity असावी म्हणून पुन्हा विदीर्ण झालेला पडदा शस्त्रक्रिया करून नीट करता येतो. याचे स्तोम आता वाढत चालले आहे. खरे तर ही शस्त्रक्रिया मोठी नाही, स्त्रीरोग तज्ञ, सर्जन ही करतात. तसे याने कोणता दुष्परिणाम होत नाही. वापरण्यात येणारी भूल, औषध याने  allergic reaction येऊ शकते. ती देखील इतर कुठल्याही शस्त्रक्रिया मध्ये येऊ शकते तशीच, पण दुर्मिळ. या शस्त्रक्रियेने वेगळ्या अशा काही अडचणी नाहीत.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)