आजचा प्रश्न

प्रश्न- प्रेग्नसीमध्ये सेक्स केल्याचे काही फायदे आहेत का ? 
उत्तर- गरोदर स्त्रीला काही अडचण नसेल आणि इच्छा असेल तर सेक्स करणे गैर नाही. पूर्ण नऊ महिने आणि पुढेही बाळाकडे विशेष लक्ष देण्यात एक-दीड वर्षे जातात. या काळात पती-पत्नी शारीरिक सुख घेत राहिले तर त्याचे फायदेच जास्त होतात. यातून रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते, त्वचेला रक्तप्रवाह जास्त होत असल्याने नवीन कामुक स्थळे सापडतात, झोप चांगली लागण्यास मदत होते, भावनिक नाते अजून घट्ट होते, गरोदरपणात सेक्स केल्याने स्त्री डिलिव्हरी नंतर सेक्समध्ये पुन्हा सक्रीय होण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. यामध्ये काही वेळा सेक्स तितकासा चांगला झाला नाही तरी काही बिघडत नाही. परफेक्शनकडे न झुकता जवळीकता अनुभवा. काही स्त्री-पुरुषांना सेक्समुळे बाळाला काही त्रास होईल का अशी भीती असते. स्त्रीरोग तज्ञाकडून सगळे नॉर्मल आहे याची खात्री केली, की पोटावर दाब न देता सेक्स करणे गैर नाही. काही केसेसमध्ये सेक्स करणे वर्ज्य असते, अशावेळी सेक्स न करणे उत्तम.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)