आजचा प्रश्न

प्रश्न- घरीच प्रेग्नन्सी टेस्ट करायची असेल तर ती कधी करावी? म्हणजे मागच्या पाळीपासून किती दिवसांनी? 

उत्तर- ज्या स्त्रीची अपेक्षित पाळी आली नाही आणि मागील महिन्यात तिचा असुरक्षित संभोग झाला असेल, तर गरोदर आहे का हे पाहण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. प्रेग्नन्सी टेस्ट स्ट्रिपचा वापर करून किंवा कार्डचा वापर करून अशा दोन किटमधे मिळते. ही टेस्ट कीट कोरड्या आणि थंड हवामानात ठेवलेले असावी, expiry date नीट पाहून घ्यावी. समजा स्त्रीला नियमित पाळी येत असते आणि ज्यावेळी ती तारीख उलटून ७-८ दिवस होऊन गेले आहेत, अशा वेळी त्या स्त्रीने सकाळी पहिली लघवी छोट्या स्वच्छ बाटलीत धरावी. त्यातली लघवी ड्रॉपरच्या साहाय्याने कार्डवरील गोल खाचेत २-३ थेंब टाकावी. काही सेकंदामधे ते थेंब आत झिरपून पुढे पुढे सरकतात. कार्डवर अजून दोन खुणा असतात. एक T(लघवीच्या थेंबाचा) इथे गरोदर असेल डार्क भाग तयार होतो, आणि C(Control) हा डार्क येतोच. म्हणजे स्त्री गरोदर असेल तर C आणि T या दोन्ही लाईन्स डार्क दिसतील, आणि फक्त C लाईन डार्क असेल आणि T लाईन डार्क नसेल तर test negative आहे असे समजते. दोन्ही लाईन्स टेस्ट करून देखील डार्क झाल्या नाहीत किंवा T डार्क आणि C लाईन डार्क नसेल तर त्या किटमधे खराबी आहे असा अर्थ होतो. हे देखील लक्षात घ्यावे, की काही दुर्मिळ केसमध्ये हा रिपोर्ट खोटा positive आणि खोटा negative येऊ शकतो. स्ट्रिप्सकिट मध्ये बाटली मध्ये स्ट्रिपच्या एका बाजूचा डार्क जाडसर भाग बाटलीतील लघवीत बुडवून ठेवावा. कार्ड प्रमाणेच बदल दिसतात. दोन्हीपैकी कोणतीही टेस्ट वापरावे. पाळी आली नाही आणि स्त्री सेक्स करतच नसेल किंवा केला नसेल तर निव्वळ पाळी पुढे गेली म्हणून ही टेस्ट करण्याची गरज नाही.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)