आजचा प्रश्न

प्रश्न- HSG टेस्ट काय असते का आणि कधी करायची असते ? 
उत्तर- HSG म्हणजे हैस्टरीओसल्फिनजोग्राफी (Hysterosalpingogram). स्त्री वंध्यत्वामध्ये ही तपासणी करतात. यात एक द्रव गर्भाशयामध्ये सोडले जाते. नंतर गर्भाशयाचे X-Rays काढले जातात. गर्भाशयाची पूर्ण बॉर्डर्स यात दिसते, गर्भाशयाला असलेल्या बीजवाहक नलिकामध्ये ब्लॉक असेल तर ते या X-Ray मध्ये दिसतात. हे ब्लॉक एक किंवा दोन्ही बाजूच्या बीजवाहक नलिकांमध्ये असू शकतात. म्हणजे स्त्री वंध्यत्वामध्ये बीजवाहक नलिका ब्लॉक आहे का हे शोधण्यासाठी हे वापरतात. स्त्रीरोगतज्ञ आणि रेडीओलॉजिस्ट हे तपासणी करतात.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)