आजचा प्रश्न

प्रश्न- इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह (ई.सी.) गर्भनिरोधक गोळ्या महिन्यातून किती वेळा घेणे अपायकारक आहे? जास्त सेवन केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात?

उत्तर- असुरक्षित सेक्स झाल्यावर गरोदर राहू नये म्हणून 72 ते 120 तासात ही गोळी सेवन करण्याची असते. 24 तासात एकदाच घ्यावी, सतत घेतल्याने प्रोब्लेम येतो असे नाही. पण पाळी येण्यामध्ये अनियमितपणा दिसून येते. गरोदर असताना ही गोळी घेतली म्हणून गर्भपात होतो असे नाही किंवा बाळाला काही अडचण येते असेही नाही. काही स्त्रियांना गोळी घेतल्यावर योनीमार्गात थोडा रक्तस्त्राव होऊ शकतो. जास्त जाड स्त्रियांना या पिलने फायदा होत नाही असे दिसून आले आहे. इतर स्त्रियांमध्ये योग्य डोस मधे सेक्स केल्यानतर 72 ते 120 तासात घेतलं की 95% यशस्वी होते. असुरक्षित सेक्स केल्याने या गोळीने गुप्त रोग आणि HIV पासून संरक्षण मिळत नाही. ही गोळी फक्त गरोदरपण टाळण्यासाठी आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अपेक्षित आहे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)