आजचा प्रश्न

प्रश्न- एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीने दारू का पिऊ नये ?
उत्तर- दारू प्राशन केल्याने एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला कोणत्या अडचणी येतात, तसेच दारूमुळे एच.आय.व्ही.चे विषाणू काही वेगळी प्रक्रिया घडवतात का, हे सांगणे तसे मुश्कील आहे, यावर संशोधन सुरू आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, दारूच्या नशेत असलेला माणूस सुरक्षित संभोग करू शकेलच असे नाही. तो दारूच्या धुंदीत असुरक्षित संभोग करू शकतो. कंडोमचा वापर चुकीच्या पद्धतीने करेल अथवा करणार नाही. त्यामुळे एच.आय.व्ही. चा प्रसार चटकन होऊ शकतो. दारू ही आरोग्याला घातक आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केले आहे. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीने तर जास्त आरोग्यपूर्ण राहणे गरजेचे आहे. म्हणून त्याने कोणतेच व्यसन करू नये. तसेच योग्य आहार, व्यायाम इ. मार्गाने स्वतःचे आरोग्य सांभाळावे तसेच विवाहित असल्यास कंडोमचा वापर करूनच संभोग करावा. अथवा सरळ हस्तमैथुनाचा उपयोग करावा.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)