आजचा प्रश्न
प्रश्न- संपूर्ण निरोगी राहण्यासाठी पुस्तके असतात, तसे संपूर्ण निरोगी कामजीवन शक्य आहे का ?
उत्तर- मुळातच संपूर्ण निरोगी राहणे ही अपेक्षा चुकीची आहे. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस कधी ना कधी तरी छोट्या-मोठ्या आजाराने पिडीत असतोच. नाहीतर डॉक्टरांचा, औषध कंपन्यांचा व्यवसाय बंद पडला असता. संपूर्ण निरोगी राहण्याची पुस्तके ही भुलभुलैय्या आहेत. कामजीवनाचा जास्तीत जास्त अभ्यास केला तर कामजीवन चांगले होण्याची शक्यता ९९% असते. १% मध्ये थोडी समस्या निर्माण होणे हे गैर नाही. फक्त अभ्यासू माणसाला लैंगिक समस्या निर्माण झाल्यावर भीती वाटत नाही. तीच अज्ञानी माणसाला लैंगिक समस्येमुळे प्रचंड भीती वाटते. इथेच भोंदू डॉक्टरांचे मार्केट सुरू होते. चांगल्या कामजीवनासाठी योग्य शास्त्रीय अभ्यास व समजून घेणारा साथीदार या दोन गोष्टी पुरेशा आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)