आजचा प्रश्न
प्रश्न- आम्हाला कोरोना होऊन गेला पण मला लक्षणे नव्हती. पत्निला अशक्तपणा खूप आहे. त्याचा सेक्स वर परिणाम होतोय. काय करता येईल ? 
उत्तर- कोरोना नंतर त्या व्यक्तीमध्ये अशक्तपणा हा एक ते तीन महिने राहू शकतो. सकस आहार घेणे, पाणी खूप पिणे आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी डॉक्टरांनी जी  औषधे सांगितली ती नियमित घेणे महत्त्वाचे असते, दरम्यान sex ची इच्छा कमी अधिक होऊ शकते. sex आसन मर्यादित करता येणे .अशक्तपणा असल्याने कामपूर्ती मिळाली अशक्तपणा जास्तच वाढू शकतो. दोघांनी चर्चा करून लैंगिक सुख घ्यावे. अगदी परफेक्टच sex व्हावा असा हट्ट नको. मुखमैथुन, परहस्तमैथुन, कामुक चित्रपट एकत्र पाहणे. एकमेकांच्या मिठीत राहणे, चुंबन घेणे यात देखील सुख घेता येईल. सध्या कोरोना मध्ये लैंगिक समस्या आल्या तरी थोडा काळ जाऊन द्यावा. बऱ्याच लोकांचे पुन्हा सुरळीत झाले आहे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)