आजचा प्रश्न
प्रश्न- गर्भधारणा होण्यासाठी संभोगसमयी स्त्रीच्या कमरेखाली उशी ठेवावी असे म्हणतात. तसे न केल्यास गरोदर होत नाही का ?
उत्तर- हा वैद्यकशास्त्रातील गैरसमज आहे. बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून असा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात पती-पत्नीच्या मनात नसताना देखील अपघाती गर्भधारणा राहते. कोणतीही उशी न वापरता म्हणजे शुक्राणूंची ताकद एवढी असते की योनीमार्गातून गर्भाशय व गर्भाशयातील बीजवाहक नलिकेपर्यंत पळण्याची तयारी असते व यातून गर्भधारणा होते. म्हणजे बाळ होण्यासाठी स्त्री पाठीवर झोपलेली व पुरुष वर अशा आसनात कमरेखाली उशी न वापरता गर्भधारणा राहू शकते हे सत्य आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)