आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक समस्या असणाऱ्यांनी लग्न करावे का ?
उत्तर- स्त्री-पुरुष दोघांना कोणतीही लैंगिक समस्या असू शकते. ती समस्या आपल्याला आहे हे आधी त्या व्यक्तिला समजले पाहिजे. पुरुषांमधे नपुंसकता, कामवासना बिलकुल नाही, समलिंगी आकर्षण, अती कामवासना, porn addiction या पैंकी काही समस्या असतील तर योग्य उपचार करायला हवा. त्यापैकी शीघ्रवीर्यपतन समस्या असेल तर लग्न न करण्याचे कारण नाही. कारण औषध घेऊन ही समस्या आटोक्यात आणता येते. Gay ने hetrosexual लग्न करू नये.
स्त्री मधे कामउदासीनता, लैंगिक इच्छा बिलकुल नसणे ह्या समस्या जास्त पहायला मिळतात. खरे तर ह्या समस्यांवर उपचार करावा लागतो. पण स्त्रीला थोडा सेक्स कमीच असतो, लाजते असे म्हणून उपचार टाळला जातो.
विवाहपूर्व मार्गदर्शन गरजेचे आहे.
समाजाला महत्वाच्या मार्गदर्शनापेक्षा निरर्थक गोष्टीत जास्त रस असतो. त्याचे परिणाम नंतर त्यांना दिसतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)