आजचा प्रश्न

प्रश्न- माझे वय ७५ वर्षे आहे. या वयात संभोग केल्यास ताकद कमी होते का? काही त्रास, अशक्तपणा येतो का?
उत्तर- तुम्ही व तुमची पत्नी दोघेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तर व दोघांची इच्छा असेल तर निर्धोकपणे संभोगसुख अनुभवू शकता. मात्र तरुणपणी जशी लिंग ताठरता येते तशी या वयात येणार नाही. एका संभोगानंतर दुसऱ्या संभोगाची इच्छा होण्यातही कालावधी जाऊ शकतो. याचबरोबर हाडांचा ठिसूळपणा यावयात वाढलेला असतो. त्यामुळे ठराविक आसनेच तुम्हाला सुखकारक आहेत. याबाबत तज्ञांकडून माहिती घ्या. यावयात तुम्ही शारीरिक सुख अनुभवता हे लोकांना समजले तर लोक नावे ठेवतील अशा खुळचट कल्पना मनातही आणू नका. शरीराने साथ दिली तर माणूस नव्वदीतही शारीरिक सुखाचा आनंद घेऊ शकतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)