आजचा प्रश्न
प्रश्न- ART औषधोपचार काय आहे ? याने एच.आय.व्ही. बरा होतो का ?
उत्तर- रुग्णाच्या रक्तामध्ये एच.आय.व्ही. असणे, याला एच.आय.व्ही.ग्रस्त म्हणतात. याची संख्या नियंत्रित ठेवताना या ART चा उपयोग होतो. यास 'अँटी रेट्रोव्हायरल थेरपी' म्हणतात. यात वेगवेगळ्या जाती असतात. त्यातील औषधांचा वापर करतात. त्याआधी रक्ताच्या काही तपासण्या कराव्या लागतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरू कराव्या लागतात. स्वतःहून सुरू करणे, थांबवणे, मात्रा कमी अधिक करायची नसते. छोट्या जाहिरातीत एड्सवर उपचार, मोफत मार्गदर्शन या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. सरकारी दवाखाना, खाजगी तज्ज्ञ डॉक्टर यांचीच मदत घ्यावी.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)