आजचा प्रश्न

प्रश्न- मी ४८ वर्षीय असून माझे पती ५१ वर्षीय आहेत. रोज ४-५ वेळा संभोग करतात. मला हे नकोसे वाटते. इच्छेविरुद्ध जबरी संभोग होतो. मी काय करू ?
उत्तर- स्त्रीमध्ये अतिकामवासना असेल तर पुरुष तिला विकृत म्हणतो, परंतु स्वतः अतिसंभोग (इच्छेविरुद्ध संभोग) करू लागला तरी त्याला ते विकृत वाटत नाही. हा पुरुषी घमेंडपणा आहे. तुमच्या पतीमध्ये ही मनोविकृती आहे किंवा मेंदूमधील काही ग्रंथींत रोग झाल्यास अशी वासना प्रचंड प्रमाणात वाढते. नक्कीच तुमच्या पतीवर उपचार करावा लागेल. यात काहीवेळा वेगळे संप्रेरक वापरून त्यांची वासना कमी करावी लागते. यामुळे त्यांची ताठरता देखील कमी येते. अर्थात संभोगक्रिया कमी होणार. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पतीशी स्पष्ट बोलून तुमचा संभोगासाठी नकार सांगावा. ही बाब घरातील मोठ्या व्यक्तींच्या लक्षात आणून द्या, कारण हा तुमचा लैंगिक छळ होतोय, हे लक्षात घ्या. 

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)