आजचा प्रश्न
प्रश्न- विवाहापूर्वी स्त्री-पुरुषांनी कोणत्या तपासण्या कराव्यात ?
उत्तर- स्त्री-पुरुषांमध्ये असलेले काही आजार हे लैंगिक जीवनात अडचणी आणतात. त्यामुळे खरे तर सर्व तरुण तरूणींनी विवाहापूर्वी काही तपासण्या करून घेणे योग्य ठरते.
दोघांच्या जनन संस्था निरोगी आहेत का याची खात्री करताना स्त्रीला मासिक पाळी येते का, स्त्री म्हणून शरीराची नॉर्मल वाढ आहे का, बीज तयार होते का, लैंगिकसुखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप आहे का, दोघेही मनाने निरोगी आहेत का, हे पाहावे. रागीट, संशय घेणे असा स्वभाव पुढे धोकादायक ठरू शकतो.
पुरुषांमध्ये लिंग आकार, पुरुष म्हणून पूर्ण वाढ झाली का, शुक्राणु चांगले आहेत का, आनुवंशिक आजार दोघांच्या मागच्या पिढीत आहेत का हे पाहणे पण महत्वाचे असते. Schizophrenia, डिप्रेशन, इतर मूड डिसऑर्डर हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. परंतु ते ही तपासावे.
सर्वात महत्वाचे म्हणजे दोघांची HIV, STD ची तपासणी करून घ्यावी आणि विवाहपूर्व लैंगिक जीवन विषयक शास्त्रीय माहिती तज्ञ डॉक्टरांकडून घ्यावी.
मला वाटते दोघांच्या इच्छेने हे सर्व केले तर वैवाहिक आयुष्य जास्त सुखाचे होण्याची शक्यता खूपच वाढते.
बाकी कुंडली, मुहूर्त बघणे हे पैसे काढायचे धंदे आहेत. पण बहुसंख्य लोकं तसल्या गोष्टींना जास्त प्राधान्य देऊन त्यावरच जास्त पैसे खर्च करताना दिसतात, ही खरी शोकांतिका आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)