आजचा प्रश्न
प्रश्न-स्त्री-पुरुष विवाहबाह्य/विवाहपूर्व संबंध ठेवल्याचे कारणे काय ?
उत्तर- इच्छेविरुद्ध लग्न झाले असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर संभोगात रममाण न होता ज्याच्याशी विवाहपूर्व होते, ते होत राहणे किंवा दुसऱ्या कोणत्याही पुरुष/स्त्रीशी संभोग करणे, शिवाय स्वतःमधील ताठरता, वीर्यपतन, वासना हे तपासण्यासाठी असे संभोग विवाहापूर्वी घडतात. स्त्री-पुरुष खाजगी नोकरीत, मोठ्या व्यवसायात पुढे येण्यासाठी एक वेळा संभोग केले तर काय बिघडते असा विचार करून मुक्त संभोग केला जातो. प्रेम प्रकरणात मुलावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेखातर मुलगी संभोगास तयार होते.
विवाहबाह्य संभोगात पती-पत्नीमधील पती मनोरुग्ण, शारीरिक आजार यात हालचाल करता येत नाही. नपुंसकत्व या आजारांनी पीडित असेल तर स्त्री वासना शमविण्यासाठी परपुरुषाचा आधार घेऊ शकते. (सर्वच स्त्रियांकडून असे घडत नाही.) स्त्री जर अति धार्मिक वृत्तीची असेल, तर तिला सेक्स वाईट वाटतो. अशावेळी पुरुष वाढलेली वासना शमविण्यासाठी बाहेर प्रयत्न करतो.
लैंगिक शिक्षणात जर जोडीदार कसा निवडावा, स्त्री-पुरुष लैंगिक समस्या व त्यावरील उपचार, शास्त्रीय कारणे समजली, तर अशा प्रकारच्या विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंधांची तीव्रता कमी करता येईल एवढेच. परंतु असे संबंध पूर्ण बंद करता येणार नाहीत.
सर्व संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुषांचे विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंध होते, आहेत व राहणार हे लक्षात ठेवावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)