आजचा प्रश्न
प्रश्न- मी २६ वर्षीय विवाहिता आहे. मला हस्तमैथुन करतानाच कामपूर्ती मिळते. पण संभोगातून कामपूर्ती होत नाही. काय करावे ?
उत्तर- कामपूर्ती मिळते हे फारच छान आहे. ती फक्त हस्तमैथुन करताना मिळते, यात गैर काही नाही. हे करताना शिश्नीकेचे उद्दीपन व्यवस्थित होत असते. परंतु संभोगावेळी शिश्नीकेवर दाब पडत नसल्याने कामपूर्ती होत नाही. 
दुसरे एक कारण म्हणजे तुमच्या पतीला माहीत नसेल, की शिश्नीकेला उद्दीपित केल्यास स्त्रीला कामपूर्ती मिळते. त्यामुळे तुमच्या पतीस कामपूर्तीबाबत स्पष्ट सांगा, तरच ते तुम्हाला मदत करू शकतील. संभोगापूर्वी कामक्रीडा करताना पतीने स्त्रीच्या शिश्नीकेचे उद्दीपन केले तर कामपूर्ती होते. शिवाय प्रत्यक्ष संभोगावेळी पत्नीने पतीवर आरूढ होऊन संभोगसुख घेतल्यास शिश्नीकेचे उद्दीपन चांगले होते व कामपूर्ती होऊ शकते. याशिवाय तुम्हाला मुखमैथुन व परहस्तमैथुन करून तुम्हाला कामपूर्ती मिळू शकते.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)