आजचा प्रश्न
प्रश्न- लिंग व वृषण लहान असतील तर त्या पुरुषाच्या चालण्यात फरक पडतो का?
उत्तर- संप्रेरक, संप्रेरक तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये जन्मतः विकृती असेल तर लिंग व वृषणग्रंथी लहान होतात व त्या प्रमाणात दाढी, मिशा, शुक्रजंतूनिर्मिती, वासना, ताठरता हे होत नाही. परंतु त्यांच्या चालण्यात फरक पडतो असे नाही. काही पुरुष चालताना स्त्रीसारखे चालतात, याचा अर्थ प्रत्येकात जननेंद्रिय लहान असते असे नाही. काहीवेळा लहान मुलांना, सतत मुलींच्या कपड्यात वावरायास लावतात, सारखे मुलींमध्ये खेळत राहणे, पुरुषांशी कमी बोलणे, घरात आई व बहीण अशा स्त्रियांमध्येच सतत वावरणे, यामुळे सवयीने थोडी चाल बदलते एवढेच. इतर करणात समलिंगी संभोगात पॅसिव्ह पार्टनर असणे, ट्रान्सवेस्टीसिझममधील पुरुष, लिंगबदल करू पाहणारा यात चालण्यात फरक असतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)