आजचा प्रश्न

प्रश्न- सध्या समलिंगी पुरुषांचे प्रमाण बरेच दिसू लागले आहे. अशावेळी मुलींनी स्थळ बघताना काय काळजी घ्यावी ?
उत्तर- मुलंमुली पदवी घेतल्यावर नोकरी व्यवसाय करत कमावते होतात. लग्न ठरवताना मुलांचे पगार, वय, घर, रूप यावर भर दिला जातो. तसेच काहींना परदेशी जाणारा, तिथे स्थायिक असणारा मुलगा योग्य वाटू शकतो. नेमके लग्न ठरवताना मुलाची लैंगिक आवड विचारात घेतली जात नाही. नंतर लक्षात येते, की मुलगा होमोसेक्श्युयल (समलिंगी) आहे. नपुंसकता, लैंगिक संबंध न ठेवणे, टाळणे यामागे ही कारणे लवकर लक्षात न आल्याने वेळ जातो. आमच्या ओळखीची फॅमिली होती ती, आम्हाला असे कांही वाटलेच नाही, मुलगा असा असेल असे आम्हाला वाटले नव्हते, अशी उत्तरे मुलींचे नातेवाईक देतात. खरे तर असे अंदाज करण्यापेक्षा त्यांची सेक्स आवड स्पष्टपणे विचारावी. म्हणजे ही फसवेगिरी होणार नाही. विवाहपूर्व मार्गदर्शन सक्तीने घ्यायला हवे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)