आजचा प्रश्न

प्रश्न- मी २९ वर्षीय विवाहित पुरुष आहे. पत्नीचे गरोदरपण, बाळंतपण यामुळे जवळजवळ वर्षभरात मला संभोगसुख नाही. या काळात माझे पुरुषांविषयीचे आकर्षण वाढल्याने जाणवत आहे. हा रोग आहे की ? उपाय काय ?
उत्तर- याला वैद्यकीय भाषेत सिच्युएशनल बायसेक्शुएलिटी (Situational Bisexuality) असे म्हणतात. वास्तविक पत्नीच्या गरोदरपणात व बाळंतपणाच्या काळात तुम्ही वर्षभर संभोग टाळले. अशावेळी हस्तमैथुन, परहस्तमैथुन, स्वप्नावस्था असे पर्याय आहेत. याकाळात तुम्ही परस्त्रीशी शारीरिक संबंध ठेवला नाही, हेही योग्य आहे. मात्र अशावेळी भिन्नलिंगी वा समलिंगी व्यक्तीचा स्पर्श तुम्हाला कामुक वाटला व असे आकर्षण निर्माण झाले असावे. पत्नी संभोगास सिद्ध नसणे यामुळेच तुम्ही असे दुसऱ्याकडे आकर्षित होत आहात. हा रोग नाही. यातून तुम्ही सहज बाहेर पडू शकता. फक्त तुमच्या पत्नीने मुलांच्या संगोपनातून तुमच्यासाठीही वेळ काढायला हवा. पत्नीने संभोगात आवड दाखवली तर तुमचे पुरुषांबाबतचे आकर्षण लगेच कमी होईल. लैंगिक समस्या तज्ञांकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. आता दिलेला एक सल्ला म्हणजे मार्गदर्शन नव्हे. तुम्हात काहीकाळ लैंगिक समस्या तज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)