आजचा प्रश्न
प्रश्न- कामात व्यस्त असल्याने सेक्ससाठी वेळ कसा काढावा? प्रमाण कमी होत चाललंय.
उत्तर- दोघेही नोकरी किंवा व्यवसायामध्ये व्यस्त असल्याने एकत्र येण्यासाठी वेळ कमी मिळतो, हे खरे आहे. सेक्सला प्राधान्य दिले, तरच वेळ निघू शकतो. रात्रीच करावा असे काही नाही. प्राईव्हसी मिळाली, की त्याचा वापर करता येतो. काहीवेळा वेळ असतो, पण दोघे किंवा एक साथीदार सोशल मीडिया, टेलिव्हिजन, स्मार्टफोन यात वेळ वाया घालवतो. हा प्रकार टाळून सेक्सला प्राधान्य देता येईल. सध्या वैवाहिक आयुष्यात लैंगिक समस्या, नातेसंबंध बिघडत आहेत, ते असा वेळ वाया घालवण्यामुळेच. लोक आभासी जगात फार रमत आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)