आजचा प्रश्न
प्रश्न- कोणत्या वयापर्यंत स्त्री-पुरुषांनी संभोग करायला हरकत नसते ?
उत्तर- दोघांचे शरीर आणि मन तयार असेल तर अगदी ८६ वर्ष वय असणारे पुरुष सेक्स करू शकतात अशा केसेस सापडल्या आहेत. सेक्स करण्यासाठी लिंग ताठरता आली पाहिजे असे जर समजले तर बऱ्याच पुरुषांमध्ये ही ताठरता पन्नाशी नंतर कमी येऊ लागते. उपचार करून देखील उपयोग झाला नाही तर अशा केसमधे सेक्स पूर्ण थांबवला जातो. लिंगाला ताठरता आली नाही तरी जेवढे शक्य आहे तेवढे आलिंगन, चुंबन, स्त्रीच्या साथीने हस्तमैथुन करू शकतात.
स्त्रीमधे योनीतील कोरडेपणा, इच्छा कमी या तक्रारी येतात. त्यामुळे स्त्रीला सेक्स नको वाटतो. हे नैसर्गिक बदल आहेत. पण उपचार, समुपदेशन, सेक्स थेरपीने थोडा फरक पडतो. सेक्ससाठी साथीदार उपलब्ध नसेल तर सेक्स टॉयचा वापर करून लैंगिक भूक भागवता येते. पूर्ण सेक्स होत नसला तरी लैंगिक जीवनातील हा एक भाग आहेच.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)