आजचा प्रश्न

प्रश्न- मी २१ वर्षांचा तरुण आहे. माझे लिंग उद्दीपित अवस्थेत साडेतीन इंच लांब आहे. माझ्या मित्रांनी सांगितले की नॉर्मल लिंगाची लांबी सहा इंच असावी लागते. लिंगाची लांबी वाढवण्यासाठी खरोखरच काही उपचार आहेत का?
उत्तर- शारीरिक संबंध ठेवताना तुम्हाला व स्त्रीला सुख मिळण्याइतपत लिंगामध्ये ताठरता येत असेल तर लिंगाची लांबी व जाडी किती आहे याला महत्व नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गातील बाहेरील फक्त पाच सेंमीचा भाग हा अतिसंवेदनशील असतो. त्यामुळे ताठ लिंगाची लांबी पाच सेंमी असली तरी पुरेशी असते. एकूण पुरुषांमध्ये ताठ लिंगाची सरासरी लांबी १४ ते १६ सेंमी असते. लिंग वाढवण्यासाठी बाजारात मिळणारे तयार मलम, इंजेक्शन्स् यांचा काहीही उपयोग होत नाही हे सिद्ध झाले आहे.
नाकाची लांबी लहान अथवा मोठी असणे यावर त्याचा श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर काही परिणाम होत नसतो. तसेच लिंगाच्या बाबतीत आहे, हे लक्षात घ्यावे. वर्तमानपत्रातील भोंदू डॉक्टरांच्या जाहिरातींना बळी पडू नका.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)