आजचा प्रश्न

प्रश्न- हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांनी शारीरिक संबंध कमी ठेवावेत?
उत्तर- अशा लोकांना दोन मजली इमारत चढताना देखील बरेचदा त्रास होतो. पण छातीत दुखणे, दम लागणे असा काही त्रास होत नसल्यास त्या व्यक्तीने शारीरिक सुख घेण्यास काही हरकत नाही. दोन मजली इमारत चढताना होणाऱ्या ताणापेक्षा कमी ताण कामसुख घेताना हृदयावर पडतो. यावेळी हृदयाचे ठोके १६० प्रति मिनिटे इतके पडतात. काही मिनिटांनंतर ते पूर्ववत होतात. खबरदारी म्हणून पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
शारीरिक संबंधावेळी पूर्ण एकांत असावा. घाई-गडबडीत, दबावाखाली संबंध ठेवू नयेत.
पुरुषाला हृदयविकार असेल तर पुरुषाने स्त्रीवर आरूढ होण्यापेक्षा स्त्रीने पुरुषावर आरूढ होऊन संभोग करावा. 
दोघांची इच्छा असल्यास मुखमैथुन करायला हरकत नाही.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर साधारणतः ९० दिवस संभोगसुख घेऊ नये.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)