आजचा प्रश्न
प्रश्न- स्तनाच्या कर्करोगामधे स्तन काढावे लागले, तर स्त्रीला सेक्समध्ये आवड राहते का?
उत्तर- शरीराचा एक भाग काढून टाकल्याने त्याचा उपयोग सेक्स करताना आता होणार नाही, सौंदर्यात स्तनाला महत्व दिले जाते, आता ती जागा कायम रिकामी जाणवणार या विचाराने लैंगिक भूक कमी होते. सेक्स, नग्नता टाळणे याकडे जास्त कल जातो. याला सतत समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे तिला समजून घेऊन साथीदाराने आधार दिला पाहिजे. स्तनाच्या आकाराचे सिलिकॉनचे ब्रेसियर उपलब्ध आहेत ते वापरता येतात. स्तन नसल्याने पुरुष साथीदाराच्या वासना, लिंग ताठरतेवर पण परिणाम होऊन तात्पुरती नपुंसकता येते. अशावेळी तज्ञ डॉक्टरचा सल्ला व मार्गदर्शन अपेक्षित आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)