आजचा प्रश्न
प्रश्न- गर्भधारणा होण्यासाठी सांगितलेल्या दिवसांमध्ये सेक्स करताना नेमके पुरुषाला ताठरता, इच्छा नसली तर काय?
उत्तर- हे खरे आहे की नेमके या दिवसात काही पुरुषांना नपुंसकता येते. पण ही मानसिक आहे. कारण घरातली मंडळी, पत्नी बाळ व्हायलाच पाहिजे, असा हट्ट करत असतात. नेमका याचा दबाव तो पुरुष घेतो आणि आतापर्यंत सगळे चांगले असताना target achieve करण्यासाठी धडपड करतो आणि अयशस्वी होतो. त्यात तो हळवा असेल किंवा स्त्री पार्टनरकडून टोकाची प्रतिक्रिया आली तर समस्या अजूनच वाढते. खरे तर पाळीचे पहिले ५ दिवस संपले की रोज किंवा एक दिवस आड सेक्स केला तरी स्त्री गरोदर होऊ शकते. त्यामुळे कॅलेंडर, तारीख बघूच नये. तरी शंका वाटलीच तर लिंग कडकपणा टिकण्यासाठी डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे एखादी गोळी घ्यावी. जस्ट एंजॉय !
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)