आजचा प्रश्न
प्रश्न- पुरुष नसबंदीनंतर वीर्यपतन होणे थांबते का ?
उत्तर- हा एक गैरसमज आहे. पुरुष नसबंदी केल्यावर वीर्यपतन होते पण त्यामधे शुक्राणू अजिबात नसतात. त्यामुळे सेक्स केल्यानं शुक्राणू नसलेलं वीर्य स्त्री योनीमार्गात पडते, त्यामुळे स्त्री त्या पुरुषाकडून गरोदर राहत नाही. वीर्यपतनामध्ये २०% भाग हा शुक्राणूचा असतो. तेवढा न पडल्याने वीर्यपतन मात्रा कमी होईल पण पूर्ण पतन थांबत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)