आजचा प्रश्न

प्रश्न- घटस्फोटामागे कोणकोणत्या लैंगिक समस्या कारणीभूत असतात?
उत्तर- स्त्री पुरुष दोघांमध्ये लैंगिक समस्या असू शकतात. पुरुषांमधे समलैंगिक आकर्षण, नपुंसकता, वासना कमी असणे, पुरुष लिंग जन्मजात विकृत असणे. ह्या समस्या जास्त सापडतात.
स्त्रीमध्ये वासना बिलकुल नसणे, योनीमार्ग सेक्ससाठी न उघडणे, सेक्सचा तिरस्कार करणे, सेक्सची तसेच पुरुषांची भीती असणे, समलैंगिक असणे ही कारणे असतात. समलैंगिकता हा भाग सोडून इतर सगळ्या समस्यांवर उपचार करता येतो. लैंगिक समस्यातज्ञाला भेटणे गरजेचे असते. नेमके लाजून किंवा भोंदू डॉक्टर्सकडून उपचार घेतला जातो आणि फसवून लग्न केले जाते. यासाठीच विवाहपूर्व मार्गदर्शन गरजेचे असते.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)