आजचा प्रश्न

प्रश्न- माझी पत्नी दोन महिन्यांची गरोदर आहे. तरी आम्ही संभोगसुख अनुभवतोय, हे योग्य आहे का? याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकेल का?
उत्तर- गरोदर असताना पत्नीच्या पोटाचा घेर वाढलेला असल्याने पोटावर दाब न देता तिच्या इच्छेनुसार संभोगसुख अनुभवता येते. काळजी घेताना शिश्नाची स्वच्छता राखावी, बोटांचा वा इतर मलमांचा, तेलांचा वापर योनीमार्गात करू नये.
या काळात स्त्रीची वासना व योनीमार्गातील स्त्राव कमी होतो. त्यामुळे वेदनायुक्त संभोग होऊ शकतो. पुरुषाची वासना अशावेळी जास्त होते. तेव्हा परहस्तमैथुन किंवा औषधी वंगण (डॉक्टरी सल्ल्यानुसार) वापरावे.
याआधी स्त्रीचा गर्भपाताचा इतिहास असेल किंवा आताच्या गरोदरावस्थेत बाळाची स्थिती बरोबर नाही असे डॉक्टरांनी सांगितले असेल तर संभोग टाळावा लागेल. ते बाळाच्या व मातेच्या हिताचे आहे.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)