आजचा प्रश्न


प्रश्न- खेळाडूंनी खेळाआधी सेक्स करू नये कारण अशक्तपणा येतो. हे खरे आहे का ?
उत्तर- सेक्सला फार ताकद लागते या गैरसमजामुळे असे लोकांना वाटत असते. उलट चांगला सेक्स केला तर मनावरील ताण हलका होतो आणि ताजेतवाने वाटते. कोणत्याच खेळाला आधी सेक्स करणे वर्ज्य नाही. प्रगत देशामध्ये हॉकी, फुटबॉल, बॉक्सिंग, टेनिस अशा मुख्य खेळांच्या आधी सेक्स करणारे खेळाडू आहेत. स्त्री खेळाडूसुद्धा आहेत.
सेक्सला अति महत्व देऊन त्याप्रमाणात मात्र शास्त्रीय माहिती न घेतल्याने कसे चुकीचे विचार मनात घर करून बसतात याचे हे उदाहरण म्हणता येईल .


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)