आजचा प्रश्न

प्रश्न- मला लिंगाचा सोरीआयसिस आहे. लिंग ताठरता येत नाही. काय उपचार आहे?
उत्तर- लिंगाचा सोरीआयसिस हा आजार कमी प्रमाणात दिसतो. त्यामुळेच ताठरता येत नाही असे नाही. तर त्वचा वेगळी झाल्याने खाज सुटते. जखमा झाल्याने ताठरता येत नाही. एकूणच सेक्स करताना मन तयार होत नाही. लिंगाला औषध लावून, कंडोम वापरून सेक्स करता येईल. त्वचारोग तज्ञ सांगतात त्याप्रमाणे औषध घ्यावे. मानसिक दबाव, मानसिक समस्यांमुळेही सोरीआयसिस वाढतो. कारणे शोधून त्यावर उपचार करावा.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)