आजचा प्रश्न
प्रश्न- जर नपुंसकतेवर सिल्डेनाफिल हे औषध आहे, तर सर्व नपुंसक पुरुषांना याचा फायदा का होत नाही ?
उत्तर- समस्या एकच असली तरी त्यामागील कारणे, परिस्थिती, त्याबरोबरच असलेले आणखी जुनाट आजार, साथीदाराची साथ, वय या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. म्हणूनच एका पुरुषाला सिल्डेनाफिलने चांगला फायदा झाला, याचा अर्थ त्याच्या मित्राने ही गोळी घेऊन त्याला चांगला फायदा होईलच असे नाही. पण लोक असे परस्पर औषध घेऊन स्वतःच अंदाज बांधतात आणि या गोळीबद्दल एक स्वतःचे मत ठरवतात. या हट्टामुळे पुढे allopathy घेणे टाळतात. पण तज्ञ डॉक्टरला भेटावे हे लक्षात येत नाही. दुसरे म्हणजे सिल्डनाफिलने फायदा झाला नाही, तर गोळी चुकीची आहे असे नाही, तर समस्या गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. गोळी वा डोस बदलून द्यावा लागतो. यासाठीच डॉक्टर ऑनलाईन उपचार तसेच परस्पर उपचार घेऊ नका असे सांगत असतात.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)