आजचा प्रश्न
प्रश्न- डायबेटीसमुळे पुरुषाला नपुंसकता येते, तसे स्त्रीला यामुळे काय समस्या येतात?
उत्तर- हे खरे आहे, की डायबेटीसमधे पुरुषांमध्ये नपुंसकता ही समस्या जास्त दिसून येते. आता allopathy गोळय़ांनी चांगले उपाय करता येतात. स्त्रीमधे योनीमार्गात संसर्ग होऊन सतत खाज सुटते. योनी कोरडी पडल्याने वेदनायुक्त संभोग होतो. त्यामुळे एकूणच स्त्री संभोग टाळण्याचा प्रयत्न करते. वासना कमी होते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली, नियमित व्यायाम, वेदना होऊ नयेत म्हणून औषधी वंगणचा वापर करुन सेक्स अनुभवता येतो. काहींमधे सेक्स जमला नाही, तरी तज्ञ डॉक्टरकडून एकमेकाला सुख देण्याचं तंत्र शिकून घ्यावी लागतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)