आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रीला सेक्स करताना वेदना होऊ नये म्हणून 'जेल' असते. हे खरे आहे का?
उत्तर- ते औषधी वंगण असते. ते योनिमार्गात लावले तर स्त्रीला सेक्स करताना दुखत नाही. पण हे सतत वापरण्यापेक्षा स्त्रीच्या योनिमार्गात सेक्स करताना ओलावा का येत नाही याचे कारण शोधून काढावे लागते. वासना नाही की दोघे एकमेकाला पुरेसे कामुक करत नाहीत, यावर योग्य माहिती दिली की, जेलची गरज नसते. काही कंडोम कंपनीने असे चांगले 'जेल' उपलब्ध केले आहेत. योनिमार्गात कोरडेपणा असला की, कधीतरी हे वापरणे योग्य. काही जोडपे सेक्समधला वेगळेपणा अनुभवण्यासाठी वापरतात. मेनोपॉजनंतर स्त्रीने वापरल्यास तिला फायदा होतो. तसेच व्हायब्रेटर, डिल्डोचा वापर करताना हे जेल वापरता येते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)